जिल्ह्यात सोमवारीही पावसाची रिपरिप सुरूच 

सिंधुदुर्ग  : रविवारी सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने सोमवारीही जिल्ह्यात रिपरिप सुरूच ठेवली होती. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुडाळ तालुक्यात सह्याद्री लगतच्या कडावल, आवळेगाव, घोडगे, हिर्लोक, ​​नारुर या गावांमध्ये तीन ते चार जोरदार पाऊस सुरु होता. तर मालवण, कणकवली, देवगड, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातही तुरळक ठिकाणी पाऊस सुरु होता. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग मिळणार आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी दुचाकीस्वारांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. 


ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: