जिल्ह्यात सर्वत्र धुवांधार पाऊस

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वत्र धुवांधार पाऊस झाला आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ​२२५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी ​१५३.​७२५ मि.मि. पाऊस झाला आहे. ​१ जून ​२०२० पासून आज पर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ​५१७ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार करता आतापर्यंत सुमारे ​१७ टक्के पर्जन्यवृष्टी झाली आहे.  
            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ​९८ (​३९२), सावंतवाडी​२१३ (​५५९), वेंगुर्ला ​७६.८​ (​५०४), कुडाळ ​९६ (​३९३),  मालवण ​१९५ (​७०५), कणकवली  ​१५३(३७५), देवगड ​१७३ (​६४६), वैभववाडी ​२२५ (​५६२), असा पाऊस झाला आहे.


ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. ​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: