जिओ २०२१ च्या दुसर्‍या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत

मुंबई : जिओ २०२१ या वर्षांच्या दुसर्‍या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दिली. त्यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत धोरणात्मकरित्या त्यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नसल्याचेही अंबानी म्हणाले.
मुकेश अंबानी म्हणाले की, २०२१ या वर्षात रिलायन्स जिओ देशात ५ जी ची क्रांती घेऊन येणार असून संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहे. सरकारला ५ जी स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवेत. देशातील ५ जी सेवांच्या बदलांमध्ये जिओ पुढाकार घेईल. देशात सध्या ३० कोटींपेक्षा अधिक २ जी सेवा वापरणारे ग्राहक आहेत.
या लोकांपर्यंत स्मार्टफोन्स पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी काही धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत. असं असलं तरीही आझ ३० कोटी ग्राहक २ जी फोनचाच वापर करत आहेत, असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: