जामसंडे येथील ‘त्या’ संशयिताची जामिनावर मुक्तता

देवगड : जामसंडे येथील पत्नीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेला संशयित आरोपी मानू नागू सुळ याला सिंधुदुर्ग येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली आहे. या कामी संशयित आरोपीच्यावतीने अँड. आशिष लोके यांनी काम पाहिले. १७ एप्रिल २०२१ रोजी संशयित आरोपीच्या पत्नीने पतीच्या त्रासाला कंटाळून जामसंडे येथील राहत्या घरी आपल्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. पुढे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पीडितेच्या भावाने संशयित आरोपी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबाबत फिर्याद देवगड पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.
त्यामुळे संशयित आरोपीविरुध्द देवगड पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान, १८६० च्या कलम ४९८-अ आणि ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासकामी देवगड पोलीसांनी १४ मे २०२१ रोजी संशयित आरोपी मानू नागू सुळ रा. जामसंडे याला अटक केली होती. आरोपीला न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी जिल्हा कारागृह येथे ठेवण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने संशयित आरोपीला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ४५ दिवसाच्या अंतरिम जामिनावर मुक्त केले होते. तथापि, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर करीत त्याची २० हजार रुपये जामीनावर सुटका केली आहे. या कामी संशयित आरोपीच्यावतीने अँड. आशिष लोके यांनी काम पाहिले.

ऋत्विक धुरी, कोकण नाऊ, देवगड

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: