जनजागृतीपर ‘शाळा’ लघुपटाची निर्मिती

मूर्ती विटंबनेवर चोख भाष्य

कुडाळ : कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात मूर्ती पूजनाला सर्वाधिक महत्व दिले आहे. परंतु, अलिकडे पीओपीच्या क्रेझमध्ये मातीच्या मूर्ती घडविण्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. ज्या पारंपरिक मूर्ती कलेने आजपर्यंत हजारो हातांना काम दिले. अतिशय सुबक हाती मूर्ती बनविल्या; त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला तेच हात पीओपीच्या मूर्तीमुळे भविष्यात रिक्त होऊ लागलेत. सर्वसामान्य मूर्तिकारांच्या हातातील कला लोप पावण्याची भीती निर्माण होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी आणि पीओपी मूर्तीपासून निसर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात पोहोचणारी हानी, विसर्जनानंतर होणारी मूर्तीची विटंबना याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘शाळा‘ या लघुपटाची निर्मिती केली आहे. हा लघुपट ५ सप्टेंबर रोजी “कान्हा प्रॉडक्शन” या यूट्यूब चॅनेल माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे.
या लघुपटाचे चित्रीकरण कुडाळ तालुक्यातील मांडकुली आणि शेटकरवाडी गावात करण्यात आले असून तेथील स्थानिकांचे खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे. धीरज परब, श्रीराम सडवेलकर, सयाजी मोर्ये, सुभाष लाड, पालव कॅटरर्स, प्राणिल नाईक, विनोद नाईक यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन व संकलन किशोर नाईक यांचे असून निर्मिती वैभव सावंत व प्रसाद बिडये यांची आहे़ संकल्पना सौरभ सर्वेकर, लेखन अजिंक जाधव, कॅमेरा संकेत जाधव आणि प्रसाद बिडीये, सहदिग्दर्शक विजय वालावलकर, ड्रोन कॅमेरा मिलिंद आडेलकर, मेकअप स्नेहा सडवेलकर, संगीत संयोजन दिनेश वालावलकर, गायक सागर कुडाळकर, पोस्टर वैदेही खोत यांचे आहे तर प्रमुख कलाकार निलेश गुरवसह कांचन धर्णे, अशोक सर्वेकर, मुग्धा शिरसाट, श्रीकांत कासले, रोहिदास चव्हाण, वैभव सावंत आहेत. या जनजागृतीच्या माध्यमातून पुढील येणाऱ्या काळात पारंपरिक पद्धतीच्या मातीच्या गणेश मूर्ती आणि गणेश चतुर्थी उत्सव पाहायला मिळेल असा विश्वास दिग्दर्शक किशोर नाईक यांनी व्यक्त केला आहे. “शाळा” हा लघुपट “कांन्हा प्रोडक्शन” या यूट्यूब चॅनलवर दाखल झालाय., तो नक्की पाहा !

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: