चिपी येथील प्रस्तावित विमानतळ ‘सिंधुदुर्ग विमानतळ’ या नावाने ओळखला जाणार

केंद्र शासनाचे परिपत्रक

कुडाळ : सिंधुदुर्गमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या विमानतळाबाबत केंद्र सरकारने परिपत्रक जाहीर केले आहे. सदर परिपत्रकानुसार, विमानतळाचे नामकरण ‘सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ असे केले आहे. प्रस्तावित विमानतळाला सिंधुदुर्ग एअरपोर्ट असे नाव द्यावे, अशी मागणी पर्यटन क्षेत्र तसेच शिवप्रेमींकडून होत होती. मागील साडेतीनशे वर्ष अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या संकल्पनेचं प्रतीक असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे नाव प्रस्तावित विमानतळाला द्यावे ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्याप्रमाणे १७ सप्टेंबर २०२१ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार विमानतळाचे नाव ‘सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ असे जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर एअरपोर्टवर प्रथम सेवा देणाऱ्या अलाइंस एअर या कंपनीच्या संकेतस्थळावर सिंधुदुर्ग एअरपोर्ट भारताच्या विमान प्रवासाच्या नकाशावर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी-परुळे या ठिकाणी होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला सिंधुदुर्ग एअरपोर्ट हे नाव दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद इतिहास जगासमोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशी केंद्र सरकारचे विमानतळाबाबत निघालेले नामांतरबाबतचे परिपत्रक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासाबाबत शुभसंकेत आहेत.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: