ग्रामपंचायत, निगुडे येथे संविधान दिन साजरा

सावंतवाडी: ग्रामपंचायत, निगुडे येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. निगुडे गावचे लोकनियुक्त सरपंच समीर गावडे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील करुणा व मैत्री या मूल्यांची बीज राज्यघटनेत रोवण्यात भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली देशावर जर काही संकट आले तर सारे भारतीय भेद विसरून एकत्र येतात ही ताकत आपल्या संविधानाने दिली आहे.
या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता टिकून आहे म्हणूनच भारतीय संविधानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी आपण संविधान दिनाचे आयोजन करतो असेही गावडे यांनी म्हटले आहे.तसेच निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनीही उपस्थित मार्गदर्शन केले. ते म्हणाले २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना प्रदान केली म्हणून या शुभ कार्याच्या निमित्ताने २६ नोव्हेंबर हा दिवस भारत भर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाचे जनक आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भारतात संविधान दिन साजरा केला जातो हे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते भारताचे संविधान हे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे भारताचे संविधान लिहिण्यासाठी २ वर्षे ११ महिने १७ दिवस एवढा कालावधी लागला २०१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले भारताची राज्यघटना म्हणजे आपले संविधान हे भारत देशाचा पायाभूत कायदा आहे आपल्या देशात संघटीत आणि एकत्रित करण्यासाठी हे संविधान लिहिले आहे असे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी म्हटले आहे. यावेळी निगुडे ग्रामसेवक तन्वी गवस यांनी सर्वांना संविधानाची शप्पथ दिली सदर कार्यक्रमाला सुचिता मयेकर (पोलीस पाटील) , तन्वी गवस (ग्रामसेवक) अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर मदतनीस विजयालक्ष्मी शिरसाट, लक्ष्मी पोखरे, ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव, परेश गावडे, डाटा ऑपरेटर सुचिता मयेकर ,किशोर जाधव, संदीप नाईक, पांडुरंग नाईक आदी उपस्थित होते.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: