गोवर्धन भजन मंडळ-वडखोल; अष्टविनायक भजन मंडळ-साळेल अव्वल

कोकण नाऊ श्रावणी भज-जन महोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

कुडाळ : कोकणच क्रमांक १ चॅनेल ‘कोकण नाऊ’ने कोरोना काळात कोकणातील कलाकारांना लाईव्ह स्वरूपात मंच उपलब्ध करून दिला. अनेक प्रकारच्या स्पर्धा या माध्यमातून घेण्यात आल्या. श्रावण महिन्यात ‘श्रावणी भज-जन स्पर्धेचं’ आयोजन करण्यात आलं होत. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. आज कोकण नाऊच्या मुख्य कार्यालयात डबलबारी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी हा निकाल कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट, मालवणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, विश्वस्त दत्तप्रसाद पेडणेकर, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, संचालिका वैशाली गावकर, कोकण नाऊचे वरिष्ठ संपादक विजय शेट्टी, चिले बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेत परीक्षक पसंतीनुसार :
प्रथम क्रमांक :
गोवर्धन प्रा. भजन मंडळ, वडखोल-वेंगुर्ला
द्वितीय : सातेरी पुरावतारी भजन मंडळ, माटणे-दोडामार्ग
तृतीय: भगवती प्रा. भजन मंडळ, बाव-कुडाळ
चतुर्थ : लिंग रवळनाथ प्रा . भजन मंडळ, पोखरण
पंचम : विमलेश्वर प्रा. भजन मंडळ, परळ-मुंबई

उत्तेजनार्थ :
गांगेश्वर प्रा. भजन मंडळ, श्रावण
ओम साईलीला भजनमाला, भांडुप-मुंबई
रवळनाथ प्रा. भजन मंडळ, पिंगुळी
मेजारेश्वर प्रा. भजन मंडळ-नागवे-कणकवली
कोटेश्वर प्रा. भजन मंडळ, हरकुळ
महापुरुष प्रा. भजन मंडळ, पिंगुळी
श्री. लिंगेश्वर पावणादेवी प्रा. भजन मंडळ, भांडुप-मुंबई

उत्कृष्ट गायक : उपेंद्र परब (गोवर्धन प्रा. भजन मंडळ, वडखोल-वेंगुर्ला)
उत्कृष्ट पखवाजवादक : विजय सावंत (ओम साईलीला भजनमाला, मुंबई)
उत्कृष्ट तबलावादक : साहिल लाड (ओम साईलीला भजनमाला, मुंबई)

उत्तेजनार्थ :
गोवर्धन प्रा. भजन मंडळ, वडखोल-वेंगुर्ला
नवतरुण युवक प्रा. भजन मंडळ, माणगाव

प्रेक्षक पसंतीनुसार :
प्रथम : अष्टविनायक प्रा. भजन मंडळ, साळेल-मालवण
द्वितीय : लिंग रवळनाथ प्रा. भजन मंडळ, पोखरण
तृतीय : ब्रम्हेश्वर प्रा. भजन मंडळ, बांबुळी-कुडाळ

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: