गांधी जयंतीचे औचित्य साधत सफाई कर्मचारी, स्वयंसहाय्यता बचतगट महिलांचा नगरपंचायतवतीने सत्कार

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा; गेले आठवडाभर नगरपंचायतमार्फत राबविण्यात येतोय ‘आझादी का अमृतमहोत्सव’

कणकवली : नगरपंचायतवतीने नगरपंचायतीच्या परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृह येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘आझादी का अमृत महोत्सव’ या सदरा खाली सफाई मित्र, स्वयंसहायता महिला बचतगट यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात कणकवली शहरातील सर्व महिला बचतगट आणि नगरपंचयातीच्या आरोग्य विभाग, पाणी विभाग, विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मागील आठवडाभर कणकवली नगरपंचयातीने मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि आरोग्य सभापती अभिजीत मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत कचरा वर्गीकरण बाबतीत अपार्टमेंटमधील नागरिकांना मार्गदर्शन करणे, सफाई कर्मचाऱ्यांची कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: