गवारेड्याने धडक दिल्याने आंबोली घाटात कारला अपघात

सावंतवाडी: गवा रेड्याची धडक बसल्यामुळे येथील युवा ठेकेदार दीपक शिवाण्णा यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार आज पहाटे घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती | भाजपचे युवा पदाधिकारी बंटी पुरोहित यांनी दिली.
दिपक हे येथील शासकीय ठेकेदार के.सी. शिवाण्णा यांचे सुपुत्र आहेत. ते सावंतवाडीतून आंबोलीच्या दिशेने प्रवास करत होते. त्या वेळी हा अपघात घडला.

रामचंद्र कुडाळकर, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: