खारेपाटण येथे वॉटर ATM मशीनचा शुभारंभ – खारेपाटण ग्रामपंचायतचा उपक्रम


 १ रुपयात १ लिटर  स्वच्छ थंडगार पाणी  ​​कणकवली​:  ​कणकवली  तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायत कार्यलयाच्या वतीने खारेपाटण बसस्थानक येथे बसविण्यात आलेल्या ” वॉटर ATM मशीन ” चा लोकार्पण सोहळा तथा शुभारंभ आज खारेपाटण सरपंच  रमाकांत राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.  
        या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,​ ​खारेपाटण व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष  सुधीर कुबल,​ ​खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  प्रवीण लोकरे,​ ​खारेपाटण गट विकास सेवा सोसायटी चे चेरमान  प्रमोद निग्रे,​ ​सामाजिक कार्यकर्ते  महेश कोळसुलकर,संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य  महेंद्र गुरव,​ ​योगेश पाटणकर, शंकर राऊत, शमशुद्दीन काझी,उज्वला चिके,​ ​रीना ब्रम्हदंडे,​ ​सोनल लोकरे,​ ​खारेपाटण बस स्थानक वाहतूक नियंत्रण प्रमुख  चंद्रकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.  
           खारेपाटण ग्रामपंचायत ​१५ व्या वित्त आयोगातील निधीमधून सुमारे  ​२ लाख ​१०,००० रुपये इतके खर्च करून खारेपाटण बसस्थानक आवारात खारेपाटण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर वॉटर ATM मशीन बसविण्यात आली आहे. १ रुपयाचे  एक कॉइन मशीन मध्ये टाकल्या नंतर 1लिटर स्वच्छ व थंडगार पाणी नागरिकांना मिळणार आहे.​ ​खारेपाटण ग्रामपंचायतच्या या नवीन लोकपयोगी  उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.  

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ​,​ खारेपाटण​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: