कोवीड काळात रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने केलेले कार्य कौतुकास्पद

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रतिनिधी सुभाष साजने यांचे वक्तव्य 

 ​२७ वा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

कुडाळ ​:​ कोवीड काळात समाजातील सर्व सामान्य लोकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवत रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रोटरी क्लब पणजी चे डिस्ट्रिक्ट ​३१७० गव्हर्नर प्रतिनिधी सुभाष साजने यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या​ ​​२७ व्या वर्धापन दिनानिमित्त हाॅटेल हिलरूफ कुडाळ येथील कार्यक्रमात केले.
 रोटरी क्लब ऑफ कुडाळ चा ​२७ वा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष ओंकार तेली, रोटरी डिस्ट्रिक्ट​ ३१७० चा असिस्टंट गव्हर्नर सिताराम उर्फ दादा कुडतरकर व प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने, सेक्रेटरी अभिषेक माने, खजिनदार अमित वळंजू, सर्व माजी अध्यक्ष, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षा पल्लवी बोभाटे, पी डी सी डॉ​. ​सायली प्रभू व सर्व सदस्या, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे सेक्रेटरी डॉ विद्याधर तायशेटये, मेघा गांगण, अॅड दिपक अंधारी, दिशा अंधारी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्ष डॉ​. ​राजेश नवांगुळ, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिटटाऊन राजेश घाटवळ, संजय पुनाळेकर, आनंद बांदेकर, दादा साळगावकर, इनरव्हिल क्लब वेंगुर्ला अध्यक्षा गौरी मराठे, कडाळ हायस्कूलचे संस्थाचालक अरविंद शिरसाठ, सुरेश चव्हाण, आदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
   यावेळी गेल्या ​२६ वर्षातील रोटरी अध्यक्षांचा सत्कार, रोटरी स्वाद पाककला स्पर्धा व सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचा बक्षिस वितरण, रोटरी सदस्यांच्या शैक्षणिक यश संपादित केलेल्या मुलांचा सत्कार, द रोटरी फाऊंडेशन ला निधी देणा-या रोटरी सदस्यांचा सत्कार, करण्यात आला.  विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या काॅनबॅकचे मोहन होडावडेकर, लघुपट निर्मिती करून आंतरराष्ट्रीय लघुपटात निवड झालेले प्रसिध्द फोटोग्राफर अनिल पाटकर व स्माईल ट्युब चॅनेलच्या लेखिका समिरा प्रभू यांचा रोटरी होकेशनल ​ऍवार्ड वार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
 कोवीड काळात रोटरी माजी अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा शासकीय महसूल व आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयातून जिल्हयातील कोरोनाबाधित रूग्णांना मोफत समूपदेशन करणारा रोटरी उमेद होम आयसोलेशन काऊसलिंग विशेष उपक्रम , मिशन टीच अंतर्गत रोटरी स्काॅलर, ई लर्निंग,प्रज्ञा रोटरी नाॅलेज उपक्रम, रोटरी युट्यूब मालिका, ऑक्सिजन काॅन्सनट्रेटेड मशिन्स लोकार्पण सोहळा, अनाथ अपंग वृध्द जोडप्याला साहित्य वाटप, कोवीड जनजागृती साठी प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञांची मार्गदर्शन मालिका युध्द कोरोनाशी एक जनजागृती व्हिडीओ सिरिज, गजाल चवथेची लघुपट निर्मिती,आरती संग्रह प्रकाशन, साक्षरता अंतर्गत प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण, सविता आश्रम ला सॅनिटायझर, मास्क, हॅंडग्लोज, फेसशिल्ड वाटप कार्यक्रम, पोलिसांना जंबो छत्री, फेसमास्क शिल्ड, वाटप कार्यक्रम, गोवेरी वाचनालय थर्मलगन ,​ऑक्सीमिटर व हॅंण्डवाॅश वाटप, इंग्रजी पुस्तके वाटप, सॅनिटरी नॅपकीन वेंडींग व इन्सिनेटर मशिन वाटप,पोलिओ जनजागृती भव्य सायकल रॅली, कोवीड जनजागृती सायकल रॅली, कोवीड योध्दा सन्मान ,रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी काॅनवेक्स मिरर उपलब्ध करून देणे, आदी समाजोपयोगी उपक्रम यशस्वी करत समाजामध्ये रोटरी इंटरनॅशनल ची प्रतिमा उंचावण्याचे उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने व टीमचे विशेष अभिनंदन प्रमुख पाहुणे व रोटरी क्लब ऑफ पणजीचे प्रसिद्ध वक्ते सुभाष साजने यांनी केले.
असिस्टंट गव्हर्नर सिताराम उर्फ दादा कुडतरकर व प्रणय तेली, नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या यशस्वी उपक्रमांबाबत गौरवोद्गार काढत शुभेच्छा दिल्या.
 रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या सामाजिक उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे जनमानसात समाधान व्यक्त होत असून शिक्षण आरोग्य सर्वच क्षेत्रात नवीन उमेद निर्माण झाली आहे. सूत्रसंचालन ज्येष्ठ रोटेरियन काशिनाथ सामंत सर, डॉ​. ​राजवर्धन देसाई, प्रमोद भोगटे, व आभार सेक्रेटरी अभिषेक माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे सर्व सदस्य, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ चे सर्व सदस्या यांचे सहकार्य लाभले.​​
निलेश जोशी , कोकण नाऊ, कुडाळ 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: