कोणालाही कितीही ताकद पुरविली तरीही शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही- आ. वैभव नाईक

​श्रावण येथील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आडवली-मालडी मतदारसंघात श्रावणमध्ये भाजपला खिंडार

पोईप​ : ​शिवसेना संपविण्याच्या अनेक वेळा वल्गना करण्यात आल्या. शिवसेना संपविण्यासाठी अनेकांना ताकद देण्यात आली. परंतु शिवसेना कधीच थांबली नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले काम सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोणाला मंत्री पद दिले, शिवसेनेच्या विरोधात कोणालाही कितीही ताकद पुरविली तरीही शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही​.​ शिवसेना वाढतच राहणार आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात आली परंतु त्याचा परिणाम उलट झाला. देवगड मधील दोन नगरसेवक शिवसेनेत आलेत. कणकवली तालुक्यात शिवसेनेचे दोन सरपंच निवडून आले. भाजपचे असगणी सरपंच हेंमत पारकर सह अनेक कार्यकर्ते व आता मालवण तालुक्यातील  भाजप पक्षाच्या श्रावणमधील भाजप कार्यकर्ते यांनी  शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचे पक्षात स्वागत आहे​ ​असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
​   ​भाजप पक्षाचे श्रावण गावातील शेकडो युवा भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यामध्ये योगेश परब,​ ​महेश मधुकर परब,​ ​संजय परब,​ ​दिपेश परब,​ ​मनोज पाडावे,​ ​विवेक धुरी,​ ​भुषण परब, भालचंद्र परब,​ ​सचिन परब, कृष्णा परब,​ ​विशाल परब,​ ​महेश परब,​ ​संतोष परब,​ ​सुमीत परब,​ ​प्रथमेश परब,​ ​दिक्षात परब,​ ​उमेश परब,​ ​संकेत परब,​ ​संतोष परब,​ ​मंदार परब,​ ​शंकर परब​ ​आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
कितीही जन आशीर्वाद झाल्या तरी आडवली-मालडी विभाग भगवामय केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाला असे अनेक धक्के येत्या काळात देण्यात येणार आहेत असे यावेळी विभाग प्रमुख बंडू चव्हाण यांनी सांगितले.यावेळी शिवसेना, विभाग प्रमुख बंडू चव्हाण, शिवसेना उप तालुकाप्रमुख बाबा सावंत माजी विभाग प्रमुख दीपक राऊत, विभाग संघटक संतोष घाडी, उपविभागप्रमुख प्रवीण परब, दुलाजी परब, नाना गुरूजी विजय पालव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. 


संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, पोईप. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: