कोकण बिझनेस फोरम तर्फे हळद लागवड व काळी मिरी लागवड ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

कणकवली : ​कोकण बिझनेस फोरम हा कोकण भूमी प्रतिष्ठान या संस्थेचा एक सामाजिक उपक्रम आहे. कोकणातील महत्वाच्या उद्योग क्षेत्रात म्हणजेच कृषी, पर्यटन, मत्स्य उद्योग, मसाला पिके व फलोत्पादन, वनशेती, प्रक्रिया उद्योग  व जलव्यवस्थापन या सप्तसुत्री वर आधारित कोकण बिझनेस फोरम ने विकासाचे विषय निश्चित केले आहेत. या विषयात कोकणातील तरुणांच्या व उद्योजकांच्या मदतीने कोकणात भविष्यात हजारो प्रकल्प उभे करणे आणि अशा प्रकल्पातून लाखो रोजगारांची निर्मिती करून नैसर्गिकरित्या समृद्ध असलेल्या कोकणाला आर्थिकरित्या सुद्धा समृद्ध करणे हा या संस्थेचा आणि उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कोकण बिझनेस फोरम चे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली.
कोकण बिझनेस फोरम मार्फत दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२० रोजी संध्याकाळी ०७.०० ते १०.०० या वेळेत हळद लागवड ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केले आहे. हळदीची शेती करून  SK-4  ह्या नवीन जातीचे संशोधन करणारे युवा शेतकरी शास्त्रज्ञ श्री.सचिन कारेकर हे या प्रशिक्षणाचे मार्गदर्शक आहेत.
तसेच २० डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत काळीमिरी लागवड संदर्भातील संपूर्ण माहिती देणारा एक दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम कोकण बिझनेस फोरमने आयोजित केला आहे. या विषयाची माहिती काळीमिरी क्षेत्रातील यशस्वी शेतकरी मिलिंद प्रभू व कृषी तज्ञ डॉक्टर जे.एल. पाटील देतील. बांदिवडे (ता. मालवण) येथील श्री. मिलिंद प्रभू यांनी  प्रथमच एक एकरावर सागासोबत काळीमिरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. सहाशे चाळीस वेलींपासून पाचशे किलोग्रॅम मिरीचे उत्पादन त्यांनी घेतेले आहे. सागावर मिरीची वेल सोडून उत्पादन घेण्याचा हा पहिलाच प्रयोग केल्याचे त्यांचा दावा आहे.  
प्रशिक्षण नोंदणीसाठी ८८५०८०७२२७​ ​/ ९०८२७८१५५१ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भविष्यात ज्यांना हळद लागवड व काळी मिरी लागवड या विषयांत प्रत्यक्ष काम करायचे आहे त्यांनी या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरामध्ये आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन कोकण बिझनेस फोरमचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या  प्रशिक्षणार्थींना या प्रकल्पांबद्दल अधिक उत्तम माहिती मिळेल व त्यामुळे कोकणात हळद लागवड व काळी मिरी लागवडीचे अनेक प्रकल्प सुरू होतील असा विश्वास संजय यादवराव यांनी व्यक्त केला.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, ​कणकवली​​. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: