केसरकरांच्या सभेतून निघण्याचा वेगळा अर्थ नको : उदय सामंत

ओरोस : माजी पालकमंत्री दीपक केसरकर मंगळवारी जिल्हा नियोजनची सभा अर्धवट सोडून गेल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. खा. राणेंनी सभेच्या सुरुवातीलाच केसरकरांवर टीका केल्याने ते निघून गेल्याची चर्चा असली तरी विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनी मात्र दीपक केसरकर यांच्या अचानक बैठकीतून निघून जाण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, आ. दीपक केसरकर यांना पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गोव्यातून विमानाने मुंबईला जायचे होते. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून ते माझ्यासोबतच होते. जिल्ह्याच्या विकासात्मक कामांबाबत त्यांनी माझ्याशी दुपारपर्यंत चर्चा केली. त्यानंतर ते गोव्यातून विमानतळावर जाण्यासाठी आपल्याला कल्पना देऊनच निघून गेले. केसरकर हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण पालकमंत्री पदाची धुरा सांभाळत असल्याचे सांगायला देखील ना. उदय सामंत विसरले नाहीत.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, ओरोस

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: