कृषी सहाय्यकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मालवण : गोळवण येथील कृषी सहाय्यक विशाल गंगाधर हंगे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुभाष लाड, ग्रामसेवक माधुरी कामेतकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोळवण गावात कृषी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या विशाल हंगे या युवकाचा मृतदेह शनिवारी सकाळी केंद्रशाळा नं. १ नजीक अमोल साळवी यांच्या मालकीच्या भाड्याने राहात असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला होता. हंगे यांच्याकडे एक चिठ्ठी मिळाल्याची चर्चा होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तर हंगे यांच्या नातेवाईकांनी या मृत्यू प्रकरणात संशय व्यक्त केला होता. दरम्यान, कृषी सहाय्यक हंगे यांचे नातेवाईक मालवणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी सदरील चिठ्ठीत नावे नमूद असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसानी चिठ्ठीत नावे नमूद असलेल्या ७ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: