कृषिमंत्री दादा भुसेंची कणकवलीत कृषी केंद्राना भेटी


शेतकऱ्यांचे केले कौतुक

कणकवली: राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी कणकवलीत महामार्गा लगत लावलेल्या कृषी माल विक्री केंद्राना भेट देत शेतकऱ्यांचे कौतुक केले. खरीप हंगाम पूर्व आढावा कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कणकवली मार्फत विकेल ते पिकेल अभियानांतर्गत संत सावतामाळी रयत बाजार योजने अंतर्गत कणकवली तालुक्यातील नागवे येथील शेतकरी स्वप्नील पाताडे व दामोदर पाताडे यांचे  जानवली मारुती मंदिर येथील कलिंगड विक्री केंद्राला भेट दिली.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विभागीय सहसंचालक कृषी कोकण विभागचे  लहाळे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  म्हेत्रे, प्रकल्प उप संचालक आत्माचे घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी हजारे, उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी अडसुळे, कृषी अधिकारी धीरज तोरणे,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कणकवली व्हि.एम.पाटील,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक देवगड एन.आर.राणे, कृ. प., सावंत, कृषी सहाय्यक तेली व शेतकरी उपस्थित होते.

​दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, ​कणकवली  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: