कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना घेराव

कुडाळ : कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना निवेदन देऊन घेराव घालण्यात आला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते या निवेदनाच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता विनोद पाटील साहेब यांनी पुढील मागण्या मान्य केल्या. त्यामध्ये
वीज ग्राहकांची कोरोना काळातील थकीत लाईट बीलासाठी वीज पुरवठा खंडित न करता त्यांना हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा देण्यात आश्वासन दिले. त्याच प्रमाणे तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे नंबर पब्लिश करण्याचे मान्य केले. वारंवार वीज खंडित होत असल्याबद्दल तात्काळ दखल घेऊन वीज खंडित न होता दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात वीज अखंडित चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनहि त्यांनी या वेळी दिले. तसेच सर्विस वायर ज्यांचे कनेक्शन घेऊन पाच वर्ष झाली आहेत. त्या ग्राहकांना सर्विस वायरचे पैसे न घेता सर्विस वायर बदलून देण्याची देण्याचे मान्य केले. शेतीपंपासाठी ज्यांनी पैसे भरले आहेत. त्या पंप मागणाऱ्या शेतकऱ्यांचे 240 येत्या सहा महिन्यात देण्याचे मान्य केले आहे. तेंडोली गावातील ट्रांसफार्मर जिल्हा नियोजन मधून मंजूर असून ते काम ठेकेदार पूर्ण करत नसल्यामुळे दुसऱ्या ठेकेदार नेमून किंवा त्या ठेकेदारा कडून तात्काळ काम करून घेण्याचे मान्य करण्यात आले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: