कुडाळ तालुका काँग्रेस कडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध

शेतकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे गृहराज्यमंत्री मिश्रा व त्यांच्या मुलास केंद्र सरकारने पाठीशी घातले

कुडाळ : लखिमपुर खेरी उत्तर प्रदेश येथे आंदोलन करून घरी परतत असताना, परतनाऱ्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे मागून जीप गाडी चढवून अमानुष हल्ला करण्यात आला. त्यात पाच ते सहा शेतकरी मृत्युमुखी पडले या सर्व घटनेला देशाचे गृहराज्यमंत्री मिश्रा व त्यांचा मुलगा कारणीभूत आहेत .असे असताना उत्तर प्रदेश योगी सरकार व केंद्र सरकार यांनी या दोघांवरही कोणतीही कारवाई केली नाही .
याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसच्या वतीने गांधी चौक कुडाळ येथे निषेध कार्यक्रम आयोजित केला होता.
त्याचप्रमाणे देशाच्या युथ आयकॉन व काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपुर येथे जाण्यापासून रोखण्यात आले. व त्यांना रोखून अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले .त्याचप्रमाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल जी गांधी व पंजाबचे मुख्यमंत्री व छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांना सुद्धा रोखण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले .
यावेळी ‘मोदी सरकार योगी सरकार चलेजाव ”गृहराज्यमंत्री मिश्रा यांचा राजीनामा दिला पाहिजे”मोदी योगी सरकार हाय हाय” अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या
यावेळी अभय शिरसाट तालुका प्रभारी अध्यक्ष,श्री प्रकाश जैतापकर जिल्हा सरचिटणीस ,विजय प्रभू जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रशेखर जोशी जिल्हा उपाध्यक्ष, प्रसादजी बांदेकर श जिल्हा बँक संचालक ,मंदार शिरसाठ कुडाळ मालवण युवक विधानसभा मतदार संघ अध्यक्ष, उल्हास शिरसाट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सदासेन सावंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाबरशेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, तोसिफ शेख शहर अध्यक्ष, वैभव आजगावकर, सुमित साळवे लतीफ शेख, बक्तावर मुजावर उपस्थित होते.

मेघनाथ सारंग, कोकण नाऊ, कुडाळ.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: