कुडाळ-एमआयडीसी उद्योजकांचा उद्या मोर्चा

​कुडाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ​ ​उद्योजकांशी कोणतीही चर्चा न करता हुकुमशाही​ ​मागणी नियम लादू पाहत आहे. याचा निषेध ​ ​राज्यभर होत आहे. याला अनुसरून कुडाळ​ ​एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने​ ​१६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उद्योजकांचा​ ​मोर्चा येथील एमआयडीसी कार्यालयावर नेण्यात​ ​येणार आहे, अशी माहिती कुडाळ-एमआयडीसी​ ​असोसिएशनचे अध्यक्ष आनंद बांदिवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक​ ​विकास महामंडळाने महाराष्ट्रात सेवाशुल्क​ ​अन्यायकारक व नियमबाह्यरित्या पाचपटीने वाढविले​ ​आहे. कुडाळ-एमआयडीसी क्षेत्र अतिमागास​ ​वर्गात (डी प्लस) प्रवर्गात येत असूनही तक्ता क्र.​ ​तीनमध्ये समाविष्ट न करता अन्यायकारक रित्या​ ​तक्ता क एकमध्ये समाविष्ट केले आहे तसेच​ ​नवीन उद्योजकांना भूखंडाच्या चाळीस टक्के बांधकाम​ ​सक्तीचे केले आहे. ते रद्द करून पूर्वीप्रमाणे असावे.​ ​तसेच जागतिक मंदी आणि आर्थिक आवकमधील​ ​घट यामुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना नवीन​ ​​सोयी-सवलती न देता पाचपटीने भाववाढ करून उद्योग बंद करण्याचे षडयंत्र शासनाचे दिसत आहे.​ ​मोर्चास स्वत: प्रादेशिक अधिकारी (रत्नागिरी) यांनी​ ​उपस्थित राहावे व ठोस निर्णय द्यावा. नपेक्षा आंदोलन​ ​तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.​​ 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: