कुडाळात पाणथळ संवाद कार्यक्रम संपन्न 

कुडाळ : येणाऱ्या पिढीच्या संरक्षणासाठी पाणथळ जागा आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हि काळाची गरज आहे, असं मत भारत सरकारच्या पाणथळ जागा समितीचे सदस्य डॉ. अफरोज अहमद यांनी व्यक्त केलं. कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयांत शनिवारी पाणथळ संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत त्यावेळी डॉ. अफरोज बोलत होते.  संत राऊळ महजर महाविद्यालय आणि सिन्धुदुदर्ग वेटलँड डॉक्युमेंटेशन कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. 

संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचं उदघाटन डॉ. अफरोज अहमद यांनी रोपट्याला जल अर्पण करून केलं. यावेळी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. एस. आर. यादव, कामशिप्र मंडळाचे कार्यवाह अनंत वैद्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. डिसले, कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे उपस्थित होते. पर्यावरण संधारण हे आजच्या काळातलं सर्वात मोठं आव्हान आहे. पर्यावरणाची गुणवत्ता दिवसेंदवस ढासळत आहे. परिणामी सजीव आणि पर्यावरणाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. म्हणूनच पुढच्या पिढीच्या संरक्षणासाठी पाणथळ जागा आणि पर्यावरणाचं रक्षण कारण हि काळाची गरज आहे असं डॉ. अफरोज अहमंद यांनी सांगितलं. यावेळी डॉ. एस. आर. यादव,  डॉ. डिसले, सचिन देसाई, श्री. खान यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. एस आर एम कॉलेजचे प्रा. कोळी यांनी तयार केलेल्या वाईल्ड सिंधुदुर्ग माहितीपटाच्या टिझर यावेळी दाखवण्यात आला. लक्ष्मण आरोलकर, अपर्णा फडके यांनी तयार केलेल्या पर्यावरण विषयक चित्रफिती यावेळी दाखवण्यात आल्या. पर्यावरण विषयक काम केलेल्या विवेक देसाई, प्रसाद गावडे, प्रवीण सावंत, मंदार इंदुलकर, नितीन कवठणकर, तिलोत्तमा मांजरेकर याना डॉ. अफरोज अहमद आणि डॉ. एस आर यादव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला कुडाळ नायब तहसीलदार सौ. चव्हाण, वेंगुर्ला नायब तहसीलदार नागेश शिंदे, श्याम सावंत यायच्या सह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. 

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: