किरण गावकर यांच्या जिद्दीतून प्रकल्पाची उभारणी – संदेश सावंत 

​कडावल :  सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को. ऑप. सोसायटी लि. शिवडाव, ता. कणकवली या  संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जैविक कोळसा प्रकल्पाला शुभेच्छा देताना  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी किरण गावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.  
शुभेच्छा देताना ते म्हणाले, या प्रोजेक्ट मधून १५० लोकांना रोजगारमिळाला आहे त्यासाठी  किरण गावकर आणि टीमचे अभिनंदन. शासनाच्या या योजनेअंतर्गत सात प्रोजेक्ट असताना आणि  अपुरा निधी असताना  सुद्धा किरण गावकर यांनी जिद्दीने हा प्रोजेक्ट सुरु केला. त्याबद्दल किरण गावकर यांचे अभिनंदन. शासनासुद्धा हा प्रक्लप उभा राहण्यासाठी चांगले सहकार्य  केले म्हणून त्यांचे अभिनंदन. हा प्रकल्प उभाकरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे संदेश सावंत यांनी अभिनंदन केले.  सर्वाना आणि किरण गावकर याना  त्यांनी शुभेच्छा​ ​दिल्या.  आपला कार्यकर्ता कशा प्रकारचा प्रोजेक्ट करतोय हे पाहावं यासाठी नितेश राणे  आवर्जून या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले.

निलेश जोशी,कोकण नाऊ, कडावल​. ​​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: