कांदा, बटाटा, लसूणच्या किमतीत घसरण, आवक वाढल्याने दर घसरले

नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठी बाजार समिती मुंबई बाजार समितीमध्ये कांद्यांच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये सोमवारी २५६ गाड्यांची आवक झाली. ३० हजार गोणी कांदा घाऊक बाजारात आला आहे त्यामुळे कांद्याचे दर गडगडले.
राज्यासह गुजरातमधील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण पाहायला मिळाली. आज मार्केटमध्ये नाशिक आणि पुण्यातील कांदा ५ ते १५ रुपये प्रति किलो तर गुजरात कांदा ५ ते १० रुपये प्रति किलो विकला जात आहे. बाजारात गुजरात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कांद्यासह बटाटा आणि लसणाचे ही दर कमी झाले आहेत. ३० हजाराहून अधिक गोणी बटाट्याची आवक आज मार्केटमध्ये झाली असून ६ ते १० रुपये प्रतिकिलो बटाटा विकला जात आहे. तर जवळपास ७ हजार लसूण गोणीची आवाक बाजारात असून २५ ते ६५ रुपये प्रतिकिलो दराने लसणाची विक्री होत आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, नवी मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: