काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज यांचे निधन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा मुंज यांचे आज निधन झाले. गेले वर्षभर ते आजाराशी झुंज देत होते. गेले काही दिवस ते गोवा-बांबुळी येथे ते उपचार घेत होते. परंतु, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने कुडाळ काँग्रेसमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेली तीन दशके घावनळे दशक्रोशीवर आपल्या कार्य कर्तृत्ववाने एक हाती सत्ता ठेवली होते. आबा मुंज यांचा अंत्यविधी आजच सकाळी १०.३० वाजता खोचरेवाडी येतील बागेत होणार आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: