कणकवली शिवसेनेच्या नवरात्रोत्सव तयारीचा खासदार विनायक राऊत यांच्याकडून आढावा

नवरात्रोत्सवाच्या जागेची केली पाहणी

कणकवली : कणकवली तालुका शिवसेनेतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी यावर्षी जागेत बदल करण्यात आला असून, दरवर्षी शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालयासमोर होणारा नवरात्रोत्सव तेथेच समोरील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली साजरा केला जाणार आहे. महामार्ग चौपदरीकरण यामुळे ही जागा बदलण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तालुका शिवसेनेतर्फे जय्यत तयारी सुरू असून, या तयारीचा आढावा खासदार विनायक राऊत यांनी आज रविवारी सकाळी घेतला. या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज खालील भागात ग्रीट टाकून सपाटीकरण करण्यात आले असून, गेले दोन दिवस शिवसेनेचे पदाधिकारी व नवरात्र उत्सव समिती पदाधिकारी या कामासाठी मेहनत घेत आहेत. या नवीन जागेची पाहणी करत खासदार राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा ही केली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, उपतालुकाप्रमुख व नवरात्र उत्सव समितीचे खजिनदार राजू राणे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, संघटक सचिन सावंत, युवा सेना समन्वयक राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, चेतन पाटील, महेश कोदे, अनुप वारंग, रिमेश चव्हाण, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: