कणकवलीत मोटरसायकलची चोरी

कणकवली : कणकवली गांगोमंदिर जवळ असलेल्या कणकवली ग्रामीण-2 या ऑफिसच्यासमोर रस्त्याच्या बाजूला मोटरसायकल लावून ऑफिसमध्ये गेलेले वायरमन विनायक नारायण देवणे (32, मूळ कुणकेरी, सध्या कणकवली) यांची मोटरसायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेली. विशेष म्हणजे ते ऑफिसमध्ये जाताना मोटरसायकलची चावी काढायला विसरले होते. तीच संधी चोरट्यांनी साधली आणि मोटरसायकल चोरून नेली. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वा. च्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कणकवली पोलिस करत आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: