कणकवलीत नगरसेवकांविरोधात ठेकेदाराची तक्रार 

कणकवली : कामतसृष्टी ते नरडवे रस्ता दुरुस्ती करणे हे काम नगरपंचायत मार्फत टेंडर प्रक्रियेने सुरु करण्यात आले आहे. यात रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरु असताना कन्हैया पारकर व रुपेश नार्वेकर यांनी कामाच्या ठिकाणी येऊन कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगारांचे साहित्य हिसकावून घेत त्यांना दमदाटी करत काम बंद करण्याचा प्रयत्न केला. याबाबत ठेकेदार अखिल पारकर यांनी कणकवली मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज देत तक्रार दाखल केली. या अर्जात असं म्हटलं आहे, की असा प्रकार जर सुरु राहिला तर शहरातील विकासकामं प्रलंबित राहतील. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी व पुढील निर्देश द्यावेत, अशी मागणी पालकर यांनी या अर्जातून केली आहे. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: