कणकवलीत तिसऱ्या दिवशीही कडकडीत बंद

जनता कर्फ्युला उदंड प्रतिसाद आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवलीत कमालीची शांतता

​कणकवली : ​कणकवलीत तिसऱ्या दिवशीही जनता कर्फ्युला १०० टक्के प्रतिसाद लाभला आहे.​ ​मात्र कणकवलीत शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व बँका सुरु  आहेत.​ ​फक्त बँक ऑफ इंडिया बंद आहे.​ ​मंगळवार हा कणकवली आठवडा बाजाराचा दिवस असूनही व्यापारी व नागरिकांनी जनता कर्फ्युमध्ये सहभाग घेतल्याने कमालीची शांतता आहे.​ ​त्यामुळे शहरात ” वा.. कणकवलीकर…” अशी एकच प्रतिक्रिया उमटत आहे.
​          ​कणकवलीत तिसऱ्या दिवशी बाजारपेठेसह शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. जनता कर्फ्युमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आहे. दुकाने बंद असल्यामुळे मुख्य बाजारपेठे,बॅंका, आचरा रोड व शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.रिक्षा देखील बंद आहेत. आवश्यकतेनुसार रुग्णांना काही खासगी रुग्णालयात व मेडिसिन मेडिकल दुकाने चालू ठेवण्यात  आली आहेत.
​           ​तसेच कणकवली शहरालगतच्या कलमठ, वरवडे, वागदे, ओसरगाव, हळवल,​ ​जानवली,​ ​गावांसह तळेरे, खारेपाटण गावातही १०० % बंद यशस्वी झाला आहे.तेथील दुकाने व नागरिकही जनता कर्फ्युत उत्स्फूर्त पणे सहभागी झाली आहेत.

​उमेश बुचडे, कोकण नाऊ, कणकवली.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: