कणकवलीत कारची दुचाकीला धडक

कणकवली : कणकवलीतून हुंबरठकडे दुचाकीने जाताना पाठीमागून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट कारने दुचाकीला धडक दिली. यात पुंडलिक आत्माराम मर्ये (67) आणि प्रमिला पांडुरंग मर्ये (65 दोन्ही रा. हुंबरठ-पिंपळवाडी) हे पती, पत्नी किरकोळ जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री 11.30 वा. च्या सुमारास कणकवली बस स्थानकासमोरील सर्व्हिस रोडजवळ घडला. दुर्गादेवीचे दर्शन घेऊन हे दाम्पत्य हुंबरठ येथे निघाले होते. याबाबतची फिर्याद पुंडलिक मर्ये यांनी दिली. या प्रकरणी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: