कणकवलीतील श्रीधर उर्फ आप्पा परब यांचे निधन

कणकवली : बिजलीनगर येथील प्रतिष्ठीत नागरिक व जुन्यापिढीतील ट्रक व चिरे व्यावसायीक श्रीधर उर्फ आप्पा हरि परब (८६) यांचे दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळ मालवण तालुक्यातील हेदूळ येथील परब कुटुंबीय व्यवसायानिमित्ताने कणकवली बिजलीनगर येथे स्थायीक झाले. आप्पा परब हे जुन्या पिढीत ट्रक व्यवसायात अग्रेसर नाव होते. त्या काळात चिरे, खडी, बाळू आदीचा मोठा व्यवसाय होता. मीतभाषी, सदा हसतमुख असलेले आप्पांची प्रत्येक गोष्टीत नेहमीच सहकार्याची भावना असायची. शहरात त्यांना आप्पा नावाने ओळखत असत. बिलजीनगर परिसरातील विकासकामांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असत. त्यांच्यावर स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजन व संजय परब यांचे ते वडील, सुहास पान शॉपचे सुनील व सुहास परब यांचे काका होते .

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: