कणकवलीतील वेडसर- बेवारस व्यक्तींचा बंदोबस्त करा!

कणकवलीतील नागरिकांची नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे मागणी

कणकवली : कणकवली पटवर्धन चौकातील वेडसर व बेवारस व्यक्तीच्या उपद्रवा बद्दल कणकवलीतील गवाणकर आणि कंपनी हार्डवेअर चे मालक गौरव गवाणकर यांच्यासह कणकवलीतील नागरिकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या निवेदनात म्हटले आहे,
आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे गवाणकर आणि कंपनी या नावाचे हार्डवेअरचे गौरव यांचे दुकान असून रात्री दुकान बंद केल्यानंतर शहरांत फिरणा – या बेवारस,वेडसर व्यक्ती दुकानासमोर येऊन शौच व मूत्र विसर्जन करतात. कचऱ्यातील वस्तू दुकानासमोर शटर्सजवळ ठेवतात. तसेच दुकानाचे बाहेर ठेवलेल्या सिंटेक्स टाक्या, पाईप , आदी फोडून नुकसान करत आहेत. तरी या बेवारस वेडसर फिरणाऱ्या व्यक्तीपासून होणाऱ्या उपद्रवामुळे सर्व व्यापाऱ्यांना नाहक होत आहे. तरी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी काजू व्यापारी राजू गवाणकर, विपुल कुलकर्णी, सचिन कुवळेकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: