कट्टा बाजारपेठ येथून २० वर्षीय युवती बेपत्ता

मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील वैभवी संदीप गुराम (वय २०) ही युवती २४ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाली आहे. याबाबत युवतीचा भाऊ करण गुराम यांने कट्टा पोलीस दुरक्षेत्रात बेपत्ता नोंद केली आहे.
        करण यांने दिलेल्या माहीतीनुसार, तो कट्टा बाजारपेठ येथे आई, वडील, बहीण वैभवीसह राहतो. बहीण वैभवी कट्टा कॉलेज येथे टीवायबीकॉम मध्ये शिकत होती. ती टायपिंग क्लासलाही जात असे. २४ नोव्हेंबर ला सकाळी १०. ३० वाजता टायपिंग क्लासला जाते असे सांगून गेलेली वैभवी परत आलीच नाही. तिचा मोबाईलही बंद येत होता. सर्वत्र शोध घेऊनही तिचा पत्ता लागू शकला नाही. याप्रकरणी पोलीस हवालदार रुक्मांगद मुंडे, पोलीस नाईक सराफदार, पोलीस कॉन्स्टेबल पुटवाड हे अधिक तपास करत आहेत.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: