उसपचे माजी सरपंच ईश्वर नाईक यांचे निधन

​ ​​दोडामार्ग ​: उसप गावचे माजी सरपंच, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि झोळंबे येथील विठ्ठल रखुमाई मंदिर वारकरी समितीचे अध्यक्ष विश्वनाथ तथा ईश्वर बळीराम नाईक यांचे बुधवारी (ता. ​२४) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. उसप सरकारवाडी येथील घरी रात्री साडेआठच्या दरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी गोव्याकडे नेले जात होते;​ ​मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले.​ ​उसप गावच्या विकासात त्यांचे महत्वाचे योगदान होते.​ ​जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांचे ते जवळचे मित्र होते.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. ऍड. दाजी तथा बळीराम नाईक यांचे ते वडील होत.​ ​

​ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, दोडामार्ग​.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: