ई-पीक पाहणी अँपमध्ये नोंदी करताना शेतकऱ्यांना निर्माण होत आहेत अडचणी

शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवून ई-पीक पाहणी नोंदणी तील त्रुटी दूर कराव्या – नर, वारगाव सरपंच

खारेपाटण : १ ऑगस्ट २०२१ पासून शासकीय पातळीवर व 15 ऑगस्ट ला प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून पीक पाहणी मोहिमेची सुरुवात केली असली तरी ई-पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी होताना दिसत नाही सदर अँप वरून नोंदी करत असताना तलाठ्यांशी संपर्क साधावा अशा आशयाचा मॅसेज येतो याबाबत मा. नायब तहसीलदार ,कणकवली यांची वारगाव सरपंच यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी चर्चा केली आहे.तरीही ई-पीक पाहणी अँपमध्ये नोंदी करताना अडचणी निर्माण होत आहे.ई -पीक पाहणी मोहिमेची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी हेळसांड लवकर थांबवून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना समज देऊन ई-पीक पाहणी नोंदणी मधील त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्या असे जाहीर पत्राद्वारे वारगाव सरपंच यांनी शासनाकडे विनंती केली आहे.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ, खारेपाटण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: