इस्त्राईल सरकारकडून खास “मराठी” तून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिजनरी नेतृत्वाचं मुंबईतील इस्त्राईलच्या दूतावासानं कौतुक केलंय. विशेष म्हणजे इस्राईल दूतावासाने ट्विटर वरून खास मराठी भाषा वापरून ठाकरेंचं कौतुक करणारं ट्विट केलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी मुंबई महापालिका आणि इस्रायलच्या IDETechnologies यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राचे पाणी गोड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाचं इस्त्रायली सरकारच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. मुंबईतील इस्रायलच्या दूतावासाने खास मराठीतून ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे’ असं ट्वीट इस्त्रायलच्या दूतावासाकडून करण्यात आले आहे.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: