आशा स्वयंसेविका करणार १८ रोजी जेलभरो 

ओरोस :  १८ रोजी जिल्ह्यातील ६०० आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती विजयाराणी पाटील यांनी दिली.
      मानधन तिप्पट करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी देऊनही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय करून शासन आदेश काढण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनने केला आहे. मानधन वाढीसाठी ४ सप्टेंबरपासून कामांवर बेमुदत म बहिष्कार टाकला असून १८ रोजी दुपारी १ वाजता ओरोस येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जेलभरो आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या निर्णयानुसार राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी ४ रोजी पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी विविध प्रकारची आंदोलने यापूर्वी करण्यात आली.


ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, ओरोस. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: