आरोग्य शिबिरास कलमठ वासियांचा योग्य प्रतिसाद 

कणकवली: दिनांक २१ नोव्हेंबर रोजी कणकवली कलमठ येथे झालेल्या आरोग्य शिबिराला कलमठ वासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे आयोजन रिसर्ज सपोर्ट अँड डेव्हलपमेंट सेंटर महाराष्ट्र  तर्फे करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन कलमठ येथील ग्रामस्थ सतीश नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. १३६ रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. ६९ रुग्णांवर पुढील मोफत उपचार वालावलकर रुग्णालय डेरवण येथे करण्यात येणार आहेत. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कणकवली.  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: