आरोग्य मंञी राजेश टोपे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वाढती कोरोना रूग्णसंख्या तसेच अपुरी आरोग्ययंत्रणा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी तातडीने मुंबई येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन देऊन प्रत्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात येऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्याची विनंती केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वाढती रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लवकरच तज्ञ डाँक्टरांचे पथक पाठवावे अशी मागणी केली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही विनंती तत्काळ मान्य करून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगून जिल्ह्य़ातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित डॉक्टरांचे पथक सिंधुदुर्गात पाठविण्यात येईल असे आरोग्यमंत्री टोपे यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना सांगितले.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: