आमदार नितेश राणे दिवसातून दोन वेळा उदय सामंत यांना फोन करतात

शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा दावा

अन्यथा शिवसैनिकच त्यांना जागा दाखवतील

कणकवली : स्वाभिमान पक्ष दोन वर्षात विसर्जित केला,ज्या शिवसेनेने वडिलांना दोन वेळा पाडले, एकदा भावाला पाडले,त्यांनी शिवसेनेवर काय बोलावे.पुढील काळात तिसऱ्यांदा विनायक राऊत बहुमतांनी निवडुन येतील.जे नितेश राणे उदय सामंत यांना दरदिवशी दोनवेळा फोन करतात,किरण सामंत यांना तुमची माणसे भेटतात.मग त्यांच्या टीका करत जनतेची दिशाभूल कशासाठी?मुबंईतील राजेंद्र कदम प्रकरण लोकांना माहीत आहे,परमवीर सिंग यांचे हाल काय आहेत,हे नितेश राणेंनी लक्षात ठेवावे,असा इशारा देतानाच जन आशीर्वाद यात्रा नव्हे तर ही दिल्लीश्वर आशीर्वाद यात्रा आहे.तुमच्या परिवाराचे अवगुण संपुर्ण जिल्ह्याला माहीत आहेत.नितेश राणे तुमची वक्तव्य थांबवा,नाहीतर शिवसैनिक तुम्हाला जागा दाखवतील,असा इशारा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिला आहे.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,महिला आघाडी प्रमुख नीलम पालव-सावंत,नगरसेवक सुशांत नाईक,राजू राठोड,नगरसेवक कन्हैया पारकर,भास्कर राणे,रिमेश चव्हाण,सुनील पारकर,रामदास विखाळे,पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,महेंद्र डिचोलकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
आ.नितेश राणे यांनी आरोप केलेत,पण दोन वेळा निवडणूक गेलेला आमदार पूरस्थितीवर बोलण्याची मानसिकता नाही.शिवसेनेवर बोलण्यास वेळ दिला,ज्या राणे परिवाराने २०१७ साली पक्ष काढला २०१९ ला विसर्जीत केला.सत्तेसाठी स्वतःच्या वडिलांना दिल्लीश्ववरांचे पाय धरावे लागले. आर्थिक तडजोडी करत राज्यसभा मिळवली.त्यामुळे नितेश राणे तुम्ही शिवसेनेची काळजी करु नका,ज्या उद्धव ठाकरेंनी राणेंना पाणी चारले.त्यांचे शिवसैनिक तुम्हाला पुरून उरतील असा इशारा अतुल रावराणे यांनी केला.
ठाकरे सरकार अतिशय चांगल्या प्रकारे राज्य चालवत आहेत.खा.विनायक राऊत हे तिसऱ्यांदा हट्रिक करणार आहेत.शिवसेनेत कुणाला कुठल्या पदावर बसवायचे हा निर्णय ठाकरे घेतात.पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगले काम केले आहे,त्याची बदनामी करु नये.मागील राऊत यांच्या निवडणुकीत तुम्ही भावाला पाडवण्यासाठी मदत केली होती का?असा सवाल अतुल रावराणे यांनी केला.
नितेश राणे तुमची कुंडली काढली तर काय होईल?राजेंद्र कदम विषयात काय केलात हे माहीत आहे.केलेलं पाप कमी होणार आहे का?.दिल्ली वारी केली तरी वजन टाकावं लागत.ज्या सामंत बंधूंचा केशर कोणी फोडला हे जनतेला माहीत आहे.वेड पांगरुन पेडगावला जाऊ नका.जनतेचे भलं करण्यासाठी काम करा.शिवसेनेत चांगल वातावरण आहे,नितेश राणे यांनी लक्षात ठेवावे,नाक खुपसू नका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे.विनायक राऊत सच्चे शिवसैनिक आहेत,ना.उदय सामंत रत्नागिरी निवडणूक आले आहे.ज्यांना दोन वर्षे आपला पक्ष चालवता येत नाही. त्यांनी शिवसैनिकांना मध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, तुमचा खोटारडेपणा संपूर्ण जनता आणि शिवसैनिकांना माहित असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
जण आशीर्वाद यात्रा नाही तर दिल्लीश्वर आशीर्वाद यात्रा आहे.कोरोनाचा नियम पाळून यात्रा काढावी.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना चांगल्या प्रकारे हाताळला आहे. त्यामुळे कोकणात यात्रा काढताना कोरोना वाढणार नाही याची काळजी घ्यावी असा टोलाही अतुल राणे यांनी लगावला आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: