आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अग्गबाई सूनबाई’ मध्ये आता एक विलक्षण वळण आलं आहे. सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरी त्या दोघांनाही घराबाहेर काढते, इतकंच नव्हे तर आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील काढून टाकते. इतकं होऊन सुद्धा सोहमला स्वतःची चूक कळत नाही आहे.  
सोहम सुझेनच्या घरी राहायला गेल्यावर तिच्या घराची अवस्था बघून परत आपल्या घरी जायला पाहिजे असं ठरवतो. पण आसावरी त्याला घरात घेणं शक्य नाही म्हणून सोहम आता आजोबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून डाव साधणार आहे. आजोबा घरी येतात सोहम बद्दल विचारतात. घरतले सगळे खोट कारण देतात की तो कामासाठी बाहेर गेला आहे. पण सोहमला आसावरीने घराबाहेर काढल्याचे आजोबांना बबडूकडून कळतं आणि आजोबांना चक्कर येते. आजोबा आसावरीकडे सोहमला परत घरी आणायचा हट्ट करतात पण शुभ्राला न्याय मिळवून देण्यासाठी आसावरीने हे उचललेलं हे पाऊल आजोबांमुळे मागे घेईल का?  आजोबांच्या हट्टापायी आसावरी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: