आजच्या पिढीला गांधींच्या विचारांची गरज

साहित्यिक महेश काणेकर यांचे प्रतिपादन

कणकवली राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

कणकवली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ कविवर्य व साहित्यिक महेश काणेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,तालुका सरचिटणीस व सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरूनकर ,कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली ,ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप कुमार जाधव, प्रदीप तळगावकर, कमलाकर तांबे ,नादीरशहा पटेल , कामत, राजू वर्णे , राजेंद्र सावंत, संतोष तेली यावेळी उपस्थित होते. यावेळी महेश काणेकर यांनी गांधी विचारांची महती प्रकट केली व आजच्या पिढीला गांधीजींच्या विचारांची कशी गरज आहे याची महती पटवून दिली. तसेच यावेळी लाल बहादूर शास्त्री यांच्या विचाराची देखील महती सांगण्यात आली व त्यांना देखील विनम्र अभिवादन करण्यात आले.

दिगंबर वालावलकर / कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: