आचरा येथे घरावर झाड पडून नुकसान

आचरा​ :​ गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा ​परिसराला चांगलेच झोडपले आहे रस्त्यावर पाणी आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.​ ​मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आचरा काझी वाडी येथील अब्दुल हमीद शफिद्दीन काझी हे कुटूंबासह पहाटे घरात झोपले असताना  घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे दिड हजाराचे नुकसान झाले. यात त्यांच्या पत्नीच्या पायावर सिमेंट पत्र्याचा तुकडा पडुन किरकोळ दुखापत झाली.

गेले दोन दिवस सोसाट्याच्या ​वाऱ्यासह मुसळधार कोसळणारया पावसाने जोर धरला आहे. यामुळे खाडी किनारी भात शेतीला धोका निर्माण झाला आहे कुडोपी आचरा जोडणारया रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. काझी वाडी येथील अब्दुल काझी हे कुटूंबासह घरी झोपले असताना पहाटेच्या सुमारास घरावर झाड पडून  घरावरील सिमेंट पत्रे तुटून घरात झोपलेल्या काझी कुटूंबावर पडले यात काझी यांची पत्नी मेरून्नीसा हिच्या पायावर सिमेंट पत्र्याचा तुकडा पडुन किरकोळ दुखापत झाली.घटनेची खबर मिळताच तलाठी काळे, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी कोतवाल गिरीश घाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.​​


अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: