आघाडीत अंतर नाही; आमचं बरं चाललंय!

जळगाव : शेतकऱ्यांनो काळजी करू नका; आता राज्यात तुमचे सरकार आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही. शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही. आमचं बरं चाललंय!, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

जळगाव, जैन हिल्स येथे आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. कर्जमुक्तीवरही मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला हमी दिली. कर्जमुक्तीची सुरुवात पुढील महिन्यात होईल. कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे. कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्याला कायमचं बाहेर काढणं हे आमचं लक्ष्य असून हे सरकार निश्चितच शेतकऱ्याला कर्जमुक्ती देईल, असा विश्वास ठाकरे यांनी उपस्थितांना दिला.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, जळगाव.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: