आईचा खून करणाऱ्याला अखेर जन्मठेप 

ओरोस : आईचा खून करणाऱ्या अनंत चंद्रकांत चव्हाण (वय ३२) याला जिल्हा न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांनी ही शिक्षा सुनावली. आईला जेवण व्यवस्थित करता येत नाही, ती एकटीच बडबडत राहते याचा राग अनंतला होता. या रागातूनच त्याने ३० मार्च ला दुपारच्या सुमारास सौ. मनीषा चंद्रकांत चव्हाण यांच्या डोक्यावर आधी लाकडाने आणि नंतर कोयत्याने वार करून त्यांना मारलं होतं. या बाबतची फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात देताच पोलिसांनी अनंत विरोधात गुन्हा दाखल करून त्याला त्याच दिवशी अटक केली होती. कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए.एल. भोसले आणि उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी तपास केला. सरकार पक्षातर्फे ॲड. संदेश तायशेटे याची काम पाहिलं. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, ओरोस

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: