आंगणेवाडी यात्रेत भाजपतर्फे मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मावाटप शिबिर

मालवण : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आंगणेवाडी यात्रेमध्ये मोफत नेत्रतपासणी आणि चष्मा वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यंदा मधुमेही रुग्णांची तपासणी केली जाणार असून अपंग आणि वयोवृद्ध भाविकांसाठी आंगणेवाडी मधील कणकवली आणि मालवण बसस्थानक येथे मोफत व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या कोणार्क रेसिडन्सी येथील तालुका कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, अवि सामंत, बाबा परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. काळसेकर म्हणाले, आंगणेवाडी यात्रेत भाजपच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचे उदघाटन १७ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते होणार आहे. यंदा यात्रेला भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री आ. रवींद्र चव्हाण, माजी मंत्री विनोद तावडे, आ. आशिष शेलार, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, आ. कालिदास कोळंबकर, आ. निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड यांच्यासह मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. आ. नितेश राणे सकाळी ८ वा. पासून येथे उपस्थित राहणार असून १० वा. विनोद तावडे, आशिष शेलार यात्रेत उपस्थित असतील. खा. नारायण राणे ११.३० वाजता यात्रेला उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत रवींद्र चव्हाण येथे उपस्थित असतील.
आंगणेवाडी यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप होणार आहे. तर यंदापासून दिव्यांगाना आंगणेवाडी यात्रेत कणकवली व मालवण बसस्थानक येथून मोफत व्हीलचेअर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी भाविकांनी स्वागत कक्षाशी संपर्क साधावा अथवा व्हीलचेअरच्या आगाऊ बुकिंगसाठी दिव्यांग आणि वयोवृध्दाना महेश मांजरेकर;(९४०४३९६१५५ ), धोंडी चिंदरकर (९८३४४४८४५७ ), विजू केनवडेकर (९४२०२०६८७३) अथवा बंड्या सावंत (९४२२६३३३१७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: