‘अटल’च्या शिशु मेळाव्यातुन जपले संस्कार : चिमुरड्यानी अनुभवलं ग्रामीण जीवन 

सावंतवाडी : आज अगदी छोट्या छोट्या बच्चे कंपनीच्या हातात त्यांच्या पालकांचे स्मार्टफोन पाहायला मिळतात. पूर्वीच्या तुलनेत बदललेली जीवन शैली अनुभवत हि पिढी मोठी होतेय. त्यांच्यावर काळानुरूप संस्कार नकळत घडत आहेत. पण आपली जी परंपरा आहे, जे आजी आजोबांचे संस्कार आहेत ते कसे मिळणार ? अर्थात हेच जाणून सावंतवाडीच्या अटल प्रतिष्ठानने एक अनोखा उपक्रम राबवला आणि या चिमुकल्यांना आपल्या परंपरा आणि संस्कारांची अनोख्या पद्धतीनं ओळख करून दिली. विद्याभारती संस्थेअंतर्गत अटल प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय शिशु मेळाव्यात ८०० शिशु सहभागी झाले होते तर सुमारे दीड हजार पालकांनी या मेळाव्याला भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं. विद्याभारती सस्थेअंतर्गत  सावंतवाडीच्या अटल प्रतिष्ठानच्या वतीने  सावंतवाडीमध्ये  या जिल्हास्तरीय  भव्य शिशु मेळाव्याच आयोजन करण्यात आल होत. वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्याच्या  ग्रामीण आणि शहरी भागातून जवळपास  ८०० चिमुरडे यात सहभाग झाले होते तर सुमारे दीड हजार पालकांनी या मेळाव्याला भेट दिली. जिल्हाभरातून आलेली हि बॅचचे कंपनी या मेळाव्यात अगदी हरखून गेली होती. त्यांच्या साठी नवीन असलेल्या गोष्टीच निरीक्षण करत होती. कोणी जात्यावर बसून ते अवघड जात ओढत होती. कोणी खलबत्याचा वापर करत होती. कोणी मुसळाने धान्य सडत होते. कोणी चुलीवर जेवण कसुन बघत होत. आपली पारंपरिक साधन कशी असतात त्यांचे उपयोग काय असतात यांचं ज्ञान या मुलांना मिळत होत. मूळ त्यात रंगून गेली होती. 

लहान मुलांवर चांगले संस्कार कसे करायचे,पालकांनी आपल्या पाल्याबरोबर कसे वागायच याच ज्ञान अशा मेळाव्यातून मुलांबरोबरच पालकांना सुद्धा मिळत होत. या  नियोजनबद्ध मेळाव्याबद्दल पालकांनी अटल प्रतिष्ठानच कौतुक केलं. मुलांवर चांगले संस्कार झाले तर  देशाची भावी पिढी ही सुसंकृत होते. म्हणूनच या अनुशंघाने मांडलेल्या प्रदर्शनातून पशु, पक्षी, गुहा, पाळीव प्राणी, वैज्ञानिक  प्रयोग, ऐतिहासिक माहिती, बारा बलुतेदारांविषयी मार्गदर्शन करण्यात आल. 
विद्याभारती संस्थेच्या वतीने अटल प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लहान मुलांना आपल्या परंपरांचं ज्ञान झालं. त्यांना नवनिवन गोष्टी समजल्या. म्हणूनच  सुसंस्कारित पिढी घडवणाऱ्या अटल प्रतिष्ठानचा हा उपक्रम  कौतुकास्पद म्हटला पाहिजे. 

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी 

JUMP Net
Mai Hyundai Aura

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: