अखिल भारतीय भंडारी समाज कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र मसुरकर यांचे निधन

​कणकवली : ​मूळ कणकवली शहरातील मसुरकर​,​ किनई येथील रहिवासी व सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले अखिल भारतीय भंडारी समाजचे कणकवली तालुका अध्यक्ष भालचंद्र श्रीधर मसूरकर (​८२) यांचे आज सकाळी ​९.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ठाणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मूळ कणकवली शहरातील रहिवासी असलेले भालचंद्र मसुरकर हे वास्तव्यासाठी सध्या ठाणे येथे राहत होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन विवाहित मुली, पत्नी असा परिवार आहे. अखिल भारतीय भंडारी समाज संघटनेकरिता त्यांचे मोठे योगदान होते. कणकवलीतील आचरा रोडवरील हॉटेल पोटोबाचे मालक गिरीश मसुरकर यांचे ते वडील तर शिवसेना कणकवली उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांचे ते काका होत.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, कणकवली​​​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: