हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावा – फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

नवी मुंबई : हिंमत असेल तर, आमचं सरकार आजच पाडून दाखवा, असं खुलं आवाहन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत हिंमत असेल तुम्ही जनादेश तपासा आणि पुन्हा निवडणूक लावा, असे थेट आव्हान दिले आहे.

नवी मुंबईत भाजपचे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा मुकाबला करण्यासाठी भाजप समर्थ असून 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं वचन बाळासाहेबांना दिलं होतं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करेन असं वचन बाळासाहेबांना दिलं होतं का? असा थेट सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलाय. काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहेत. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन त्यांचं खरं हिंदुत्वाचं रक्त जागं होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, नवी मुंबई.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: