वैभववाडी येथे विचारवैभव व्याख्यानमालेचे आयोजन

वैभवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ आणि सत्यशोधक विद्यार्थी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने वैभववाडी येथे विचारवैभव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दिनांक १८,१९,२० फेब्रुवारी रोजी असून, मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वैभववाडी येथे सुरू होईल. पहिल्या दिवशी व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर अनिल फराकटे यांचं ‘भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तीचा अधिकार आणि आमचे वर्तन’ या विषयावर, दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी १०:३० वाजता व्याख्याते ज्ञानेश्वर बंडगर यांचं ‘कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आणि तिसऱ्या दिवशी गुरुवारी व्याख्याते राजन इंदुरकर यांचं एनआरसी- सीसीए अर्थ अन्वयार्थ’ या विचारवैभव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. प्रबोधनाच्या या जागरात सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी तालुका बोद्ध सेवा संघ अध्यक्ष आयुनी शुभांगी यादव व सत्यशोधक अध्यक्ष आयुष्मान अमोल कांबळे यांनी केले आहे.

उमेश बुचडे, कोकण नाऊ, वैभववाडी.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: