वानिवडे- पावणाई गावच्या पोलीस पाटीलांना पुरस्काराचे वितरण

देवगड : तालुक्यातील वानिवडे गावचे सुपुत्र तथा कै. नारायणशेठ तुकाराम बांदकर यांच्या स्मणार्थ नातू ओमकार रजनीकांत बांदकर यांच्या हस्ते वानिवडे – पावणाई गांवचे पोलिस पाटिल तथा गावचे सुपुत्र गुरूनाथ तुकाराम वाडेकर यांना ओमकार वधु – वर सुचक मंडळ तर्फे आदर्श पोलिस पाटिल पुरस्कार २६ जाने २०२० रोजी जि. प. आदर्श शाळा पावणाई नं १ या शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

या कार्यक्रमाला गुरूनाथ वाडेकर ( पोलिस पाटिल ),ओमकार बांदकर ( ओमकार वधु – वर सुचक मंडळ – मालवण ), परब सर ( माजी मुख्याध्यापक ), मालंडकर सर ( मुख्याध्यापक ), जायबाय सर ( शिक्षक ), बेले मँडम ( शिक्षिका ), कु बबन टुकरूल, ज्ञानदेव करंजे ( जेष्ठ पत्रकार ), पप्पू मासये ( शिक्षण कमिटी उपाध्यक्ष ) रविंद्र मेस्त्री ( शिक्षण कमिटी अध्यक्ष ), प्रसाद मेहता , रवि लाड व सर्व गांवचे लोक यावेळी उपस्थितीत होते.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: